‘शिवसेना कोणी फोडली याची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील लोकांना आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खूप उशिरा आपल्याला मशाल हे चिन्ह मिळाले, मात्र शिवसैनिकांनी मशाल घराघरात पोहचवली आणि याच धगधगत्या मशालीने शिवसेनेने दिल्लीश्वरांच्या बुडाला आग लावली आणि या निवडणुकीतही तेच करायचे आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘लोकसभेला काहींनी मशाल या चिन्हावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता हे चिन्ह घराघरात पोहचले आहे. लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्त मते शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळवायची आहेत. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, विजय आपलाच आहे,’ असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.