जागरूक राहा, वैऱ्याला आताच गाडा आणि महाराष्ट्राचे रक्षण करा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

चाळीसगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी निवडणूक आयोगाकडून झालेल्या बॅगा तपासणीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या बॅगा जरूर तपासा. पण मोदी-शहा, फडणवीस, मिंधे यांच्या बॅगा महाराष्ट्रात येताना तपासाच, पण महाराष्ट्राबाहेर जातानाही जरुर तपासा, ते महाराष्ट्र लुटून नेत असतात, असा जबरदस्त प्रहारही उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजप आणि मिधेंच्या खोट्या आश्वासनांना आता जनता भूलणार नाही. त्यांचा जातीधर्मात फूट पाडण्याचा डाव जनतेने हाणून पाडवा आहे. आता जागरूक राहिला नाही तर फक्त रात्रच नाही दिवसही वैऱ्याचा असेल. त्यामुळे जागरुक राहा,वैऱ्याला आताच गाडा आणि महाराष्ट्राचे रक्षण करा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

जनता येथे दुपारपासून थांबली आहे, असे प्रेम आजच्या जगात दुरापास्त आहे. हे प्रेम पैशांनी विकत घेता येत नाही, विकलेही जात नाही. मिंधे आणि भाजप यांना आपण सांगतो की, भले त्यांच्याकडे पैसे खूप असतील, खोक्याने असतील, ही माझी संपत्ती आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. जनतेच्या या प्रेमाची आपण भराई करणार.आपण भआजपवाले नाही. वापरा आणि फेका, हे आपले धोरण नाही. संघर्षाच्या काळात, संकटात, लढाईत जो साथ देतो, त्याला मी कधीही अतंर देत नाही, देऊ शकत नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी मी घेत आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली फोटोग्राफी बंद झाली होती. आज पुन्हा फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली. निवडणूक आय़ोगाने फोटोग्राफी करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असा टोलाही त्यांनी लगावला. याचा व्हिडीओ आपण स्वतःच काढला. माझी बॅग जरूर तपासा, माझ्या बॅगेची तपासणी करतात, तशी मोदी, शहा, फडणवीस, मिंधे, फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्याचे धाडस तुमच्यात आहे काय, असा सवाल त्यांनी केला. जो कायदा मला आहे, तो कायदा मोदी- शहा यांनाही आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपद स्वीकारताना घटनेची तत्वे मानीन, कोणाशाही भेदभाव करणार नाही. मोदी दिल्लीत देशाचे पंतप्रधान म्हणून बसले आहे. भाजपचे पंतप्रधान म्हणून ते बसले नाहीत. भाजपचे पंतप्रधान ते असतील, तर त्यांनी गुजरातला भाजप कार्यालयात बसावे. माझी बॅग त्यांनी नेहमी तपासावी, माझ्यामागे बॅग घेणारे कोणी नाही. माझे तेवढे ओझे कमी होईल. माझ्या बॅगा तपासा. पण मोदी-शहा ,फडणवीस यांचीही तपासा. त्यांची बॅग येताना जरुर तपासा. मात्र, महाराष्ट्रातून जाताना जरूर तपासा. राज्यातून लुटबन ते बाहेर नेत असतील, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

सिंचनाचे प्रकल्प अनेक वर्ष ऱखडले आहेत.
आपले सरकार आले असते तर सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले असते. नतद्रष्ट सरकारने काहीही केले नाही
सर्वोच्च न्यायालयात अद्याप निकाल लागलेला नाही.
डी. वाय. चंद्रचूड हे अतिशय उत्तम प्रवचनकार आहेत.
हा लढा उद्धव ठाकरे, शिवसेना यांचा नाही, लोकशाहीचा लढा आहे.
मात्र, ते आम्हाला न्याय देऊ शकले नाही, आता नवीन सरन्यायाधींशांनी न्याय द्यावा, अशी विनंती आपण करत आहोत
आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहेत
जागरुक राहा अन्यथा महाराष्ट्राल दिवसही वैऱ्याचे येतील
जागरुक राहा आणि वैऱ्याला आताच गाडा आणि महाराष्ट्राचे रक्षण करा
देश म्हणजे देशातील जनता, शेतकरी यांच्यासाठीच काम करायचे आहे.
मनी नाही भाव, देवा मला पाव असे मिंध्यांचे झाले आहे.
त्यांच्या मनात काही वेगळचे आहे, ते फक्त तुम्हाला नमस्कार करत आहेत
त्यांना 50 खोक्यांचा भाव मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही?
कापूस दूध, सोयाबीन, डाळी यांना भाव नाही, कांदा उत्पादक धास्तावले आहेत
स्वतःला विश्वगुरू म्हणवतात आणि उद्धव ठाकरे यांना घाबरतात
माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, उद्धव ठाकरेला संपवले असे म्हणतात, मग एवढी भीती का वाटते
भाजपला राजकारणात मुले होत नाही, त्यात आपला काय दोष?
ना ते नेता देऊ शकत, त्यांचे नाणे आता चालत नाही
राममंदिर बांधले, ते गळतेय, विमानतळाचे छत कोसळते, नवे संसद भवन गळतंय, असे वांझोटे राजकारण सुरू आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, हा घाव महाराष्ट्राच्या वर्मी लागला आहे
मोदीनी धमकी दिल्यासारखी माफी मागितली, फडणवीस यांनी अजून माफी मागितली नाही
फडणवीस यांनी मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याचे आव्हान दिले, मात्र, ठाणे जिल्हा कोणाकडे आहे
मुंब्राच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराज , जिजाऊ यांचे शिल्प आहे, याचा त्यांना विसर पडला असेल.
वडिलोपार्जित वारसा सांभाळणे येरागबाळाचे काम नाही.
ईडी, सीबीआय आमच्यामागे लावण्यापेक्षा त्यांच्याकडून योग्य माहिती घ्या
राहुल गांधी शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले होते
जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव फसला आहे, जनतेला आता सत्य कळले आहे
महाराष्ट्र लुटू द्यायचा नसेल तर आपल्यात फूट पडू द्यायची नाही
कोरोना काळातही साडेसहा लाख कोटींचे उद्योग आपण इथे आणले होते.
ते सत्तेत आल्यावर स्वार्थासाठी त्यांनी उद्योग गुजरातमध्ये पाठवले
त्यांच्यासमोर महाराष्ट्र लुटला जात आहे आणि ते शेपूट हलवत बघत आहे
महाराष्ट्रात निवडणूक असताना गुजरातमध्ये धुमधडाक्यात टाटा एअरबसचे उद्घाटन करण्यात आले
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बहीणींना 3000 रुपये देणार
मुलींप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत करणार
अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार
25 लाखांपर्यत कॅशलेस उपचार देणार
जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार
शेतकऱ्यांना हमीभाव आणि 3 लाखांपर्यंत कर्जमुक्ती करणार, सिंचनाचे प्रश्न सोडवणार
भाजपमध्ये आता सच्च्या कार्यकर्त्यांना स्थान नाही, त्यांच्या डोक्यावर भ्रष्टाचारी बसवले आहे
मोदी यांच्या इंजिनाला लागलेली भ्रष्टाचाराची चाके आण्ही पंक्चर करणार आहोत.
त्यामुळे निष्ठांवत भाजप कार्यकर्त्यांनी 20 तारखेला योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.