राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
वाचा प्रमुख मुद्दे –
- निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्याबाबत घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. राज्य सरकारच्या थोबाडीत दिली आहे. ज्या व्यक्तीचा कारभार संशयास्पद आहेत, सत्तेच्या गैरवापरासंदर्भात लोक जाहीरपणे बोलतात अशा व्यक्तीला बढती देऊन त्यांच्या कालखंडामध्ये निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता – शरद पवार
- मैत्रिपूर्ण लढतीच्या रस्त्यावर जाण्याची अजिबात इच्छा नाही – शरद पवार
- शेकापशी चर्चा झाली. आम्ही उरणची जागा लढत असून पहिले ठरल्याप्रमाणे अलिबाग, पेण आणि पनवेल येथे शेकाप लढेल – उद्धव ठाकरे
- आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवत आहोत – उद्धव ठाकरे
- तीन वाजल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. कुणी सांगूनही अर्ज मागे घेतले नसतील तर नाईलाजाने पक्ष कारवाई करेल – उद्धव ठाकरे
- आम्ही आमच्या पक्षातील सगळ्यांना सूचना देत आहोत. शरद पवार आणि काँग्रेसही देत आहे. अनेकांनी अर्ज मागे घेतले असून काही अर्ज मागे घ्यायला चालले आहेत – उद्धव ठाकरे
- आमची भूमिका कुणीही एकमेकांविरुद्ध न लढता, एकत्रितपणे काम करा – संजय राऊत
- उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अशा अनेक उमेदवारांशी संपर्क साधून अर्ज मागे घेण्यास सांगितले. 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल – संजय राऊत
- मित्रपक्षांना त्यांच्या जागा दिल्या आहेत. तरीही शेकाप, सपा, कम्युनिस्ट पक्षांनी काही ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यातील कॉम्रेड कराड आले होते. त्यांनी नाशिक पश्चिम येथून अर्ज भरला होता. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा केल्यावर ते अर्ज मागे घेत आहेत – संजय राऊत