उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मांडला जाणार जनतेचा जाहीरनामा, शरद पवार यांचीही प्रमुख उपस्थिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 100 स्वयंसेवी संस्था उद्या जनतेचा जाहीरनामा मांडणार आहेत. या संस्थांची बैठक उद्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत असून त्या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आदिवासींचा विकास आणि कल्याणासाठी यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनने आदिवासी विकास केंद्राची स्थापना केली. त्या केंद्राच्या वतीने आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, पोषण, उपजीविका, रोजगार, जल, जंगल, जमीन, स्वशासन कायदा यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय बैठक उद्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत आहे. दुपारी 2 वाजता त्या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या बैठकीत राज्यातील 100 संघटना संस्थांचे प्रतिनिधी आरोग्य, शिक्षण, उपजीविका, नैसर्गिक संसाधनांचा अधिकार या विषयावर आजची स्थिती आणि लोकांचे प्रश्न व त्यावर जनतेचा जाहीरनामा काय असेल याची मांडणी करणार आहेत. त्या चर्चेवरून जनतेचा जाहीरनामा बनवला जाणार आहे. या बैठकीला केंद्राच्या सुकाणू समितीचे सदस्य दिलीप गोडे, प्रतिभा शिंदे, अॅड. पुर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे, अॅड. इंदवी तुळपुळे आदी उपस्थित राहणार आहेत.