![uddhav thackeray](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/06/uddhav-thackeray-696x447.jpg)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे देखील होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे खोके सरकारच्या निरोपाचे भाषण असणार असा टोला त्यांनी लगावला. ”उद्यापासून महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. हे महाराष्ट्रातील या खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.