मुंबई दंगलीत सामील झालो म्हणून उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्याच्या खोट्या बातम्या काही जणांनी व्हायरल केल्या होत्या. त्या बातम्या पसरवणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी अंधेरीतील मेळाव्यात खरपूस समाचार घेतला.
”’92 च्या दंगलीसाठी मी माफी मागितली असं खोटं पसरवलं होतं. कधी माफी मागितली कोणाकडे माफी मागितली? माफी मागितली हे जर खरं असेल तर ती माफी उद्धवजींनी नाही तर अटलजींनी मागितली होती. Babari WAS A Terrible mistake हे उद्धव ठाकरे नाही तर लालकृष्ण आडवाणी म्हणाले होते. आडवाणी अजूनही आहे अमित शहा यांनी जाऊन त्यांना विचारावं. नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंनी नाही तर तुमच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता. लहानपणी आमच्या शेजारी मुसलमान कुटुंबं राहायची, ईदच्या दिवशी आमच्या घरी त्यांच्याकडून मला जेवण यायचं आणि मी त्यांच्या ताजे खालणं जायचो हे उद्धव ठाकरे नाही तर नरेंद्र मोदी बोलले होते. किती काढू. सगळे जण टोप्या घालून बसले आहेत. मोहन भागवत मशिदीत गेले होते उद्धव ठाकरे गेलेले नाहीत, असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
”उद्या देशाचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या तिरंग्यात देखील हिरवा आहे. जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष तुमच्या कार्यालयावर लावत नव्हता. तुम्ही जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असाल तर आमचा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे ज्याला डाग लावायचं काम तुम्ही केलं. आम्ही देशप्रेमी मुसलमानांना आपलं मानतोच. देशप्रेमी मुसलमानांनी आमंचं हिंदुत्व मा्न्य करून आम्हाला मतदान केलं त्याचा जर तुम्हाला पोटशूळ उठत असेल तर मी अमित शहांना जाहीर आव्हान देतोय की भाजपच्या झेंड्यातील हिरवा काढा व नंतर आम्हाला हिंदुत्व शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना केले.
”उद्या देशाचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या तिरंग्यात देखील हिरवा आहे. जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष तुमच्या कार्यालयावर लावत नव्हता. तुम्ही जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असाल तर आमचा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे ज्याला डाग लावायचं काम तुम्ही केलं. आम्ही देशप्रेमी मुसलमानांना आपलं मानतोच. देशप्रेमी मुसलमानांनी आमंचं हिंदुत्व मा्न्य करून आम्हाला मतदान केलं त्याचा जर तुम्हाला पोटशूळ उठत असेल तर मी अमित शहांना जाहीर आव्हान देतोय की भाजपच्या झेंड्यातील हिरवा काढा व नंतर आम्हाला हिंदुत्व शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना केले.
1987 साली जी पहिली पोटनिवडणूक झालेली देशातील सर्व निवडणूकीच्या इतिहासात ती पहिली निवडणूक होती जी हिंदुत्वावर जिंकलेली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी दाखवून दिलेलं की हिंदू देखील मतदान करून जिंकवून देऊ शकतात. काढा इतिहास त्या वेळचा. शिवसेनेसोबत कोण होतं आणि शिवसेने विरोधात कोण होतं. त्यावेळेला शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू , काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे निवडणूकीला उभे होते. हिंदुत्वाचा तुफान प्रचार झाला. त्याही वेळच्या शिवसेनाप्रमुखांच्या भाषणात त्यांनी म्हटलं आहेच की आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही. पण हिंदू जरी पाकधार्जिन्या असला तरी तो आमचा नाही. एवढं स्पष्ट आणि सोप्प आहे. तेव्हाचा इतिहास काढला तर तेव्हा दुहेरी लढत नव्हती झाली. शिवसेनेचे प्रभू विजयी झाले पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी भाजपने जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना पाठिंबा दिला होता. का तेव्हा हिंदू म्हणून तुम्ही आमच्या सोबत आला नाहीत मग तुमचे प्रमोद महाजन आले व मातोश्रीचे उंबरठे झिजवायला. कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करायचा होता. भाजप, आरएसएस हे सगळे असेच आहेत. करणार काही नाही. आगी पेटवायच्या आणि दंगली उसळल्या की पळून जायचं. बाबरी बाबरी म्हणून माहोल पेटवलं पण प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाय त्यातले, अशी तुमची नामर्दाची औलाद आणि तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व शिकू. तिच ती निवडणूक होती हिंदुत्वाची व त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. त्याच निवडणूकीनंतर त्यांना निवडणूक लढवण्यापासून सहा वर्ष लांब ठेवण्यात आलं होतं. तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं तर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबाचं प्रेम शिकवतंय. 2000 साली छगन भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला. नंतर सगळं मिटलं ते घरी आले वगैरे झालं. पण जेव्हा ते अटक करायला निघाले होते तेव्हा आडवाणीजी उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली तर राज्यात आगडोंब उसळेल तो उसळू नये म्हणून केंद्रीय राखीव दलाला बंदोबस्तासाठी महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांवरील प्रेम. काढायची झाली तर तुमची सालटी खूप काढता येतील. एवढी सालटी काढता येतील की तुम्ही गावात फिरायच्य़ा लायकीचे राहणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.