ठाण्यात खोक्याच्या केंद्रबिंदूच्या बुडाला मशाल लावल्यावर महाराष्ट्र गद्दारमुक्त होणारच; उद्धव ठाकरे यांची गर्जना

ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मिंध्यांवर तोफ डागत थेट मिंध्यांना आव्हान देले. तुम्ही मर्द असाल तर हिंदुहृयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो न लावता स्वतःच्या वडिलांचे फोटो लावत ठाण्यात निवडणूक लढून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. ही निवडणुकीची लढाई शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची नाही. आपल्याला महाराष्ट्र गद्दारमुक्त करायचा आहे, एकही गद्दार महाराष्ट्रात वळवळता कामा नये, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

कल्याण डेबिंबलीतून रस्त्याने आलोय, तरी तुमच्यासमोर उभा आहे, येथील रस्त्यांची स्थिती तुम्हांला माहिती आहे. आपण महाराष्ट्रात फिरतोय. आता राज्यात कोठेही सभेची, भाषणाची गरज नाही. जनतेची आपल्याला जबरदस्त साथ मिळत आहे. ठाणे हे खोक्याचे केंद्रबिंदू आहे. या केंद्राच्या बुडाला मशाल लावल्यावर महाराष्ट्र गद्दारमुक्त होणार आहे. ही निवडणुकीची लढाई शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची नाही. आपल्याला महाराष्ट्र गद्दारमुक्त करायचा आहे, एकही गद्दार महाराष्ट्रात वळवळता कामा नये, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

लोकसभेत त्यांनी जबरदस्त टक्कर दिली. त्यामुळे महाराष्ट्राला ताकद मिळाली आहे. महाराष्ट्राला आणि कलंक लावत बदनामी केली. त्यांना धडा शिकवत हा कलंक पुसून टाकण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आता 20 तारखेला जनता त्यांनी धडा शिकवणार आहे. ते काहीही न करता कोट्यवधी रुपये जाहिरातीवर पैसा उधळत आहेत. हा पैसा जनतेचा आहे. काम केलय भारी, लुटलीय सगळी तिजोरी आता जे आता तेदेखील ते साफ करणार आहे. त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी ठाणा महापालिकेची सगळी तिजोरी लुटली आहे. त्यांच्या कंत्राटदारी मित्रासाठी ठाणा महापालिकेला त्यांनी भिकेला लावले आहे. त्यांच्या कंत्राटदार मित्राला आपण मुंबई पालिकेत पाय ठेवायला देत नव्हतो. म्हणूनच त्यांनी आपले सरकार पाडले. मुंबई महापालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवी त्यांच्या मित्रांनी लुटल्या, अशी टीकाही त्यांनी केली

लोकसभेला मोदी आपल्याला नकली संतान म्हणाले होते, त्यानंतर महाराष्ट्राने भाजपच्या पेकाटात लाथ घातली आहे. म्हणून आता माझे नाव घेताना त्यांचा थरथराट होतो. आपण विकासाला कधीही स्थगिती दिली नाही. कोस्टल रोड हे स्वप्न शिवसेनेचे आहे. शिवडी-न्हावा शेवा रोडचे काम लॉकडाऊनमध्येही सुरू होते. मात्र, महाराष्ट्राचे हक्क ओरबाडणाऱ्यांच्या आडवे आपण येणारच. आपण कोणालाही महाराष्ट्र लुटू देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

गद्दारांच्या प्रचारसाठी पंतप्रधानांना का यावे लागते. ठाण्यातही आपण अजून ताकद लावली असती, तर लोकसभेत गद्दार निवडून आलेच नसते. ते मर्द असतील तर त्यांनी हिंदुहृयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो न लावता स्वतःच्या वडिलांचे फोटो लावत ठाण्यात निवडणूक लढून दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. आता गद्दारांचा भ्रष्ट कारभार जाळण्यासाठी जनता आपल्यासोबत आहे.

आपल्याला वाटले, आता डोंबिवलीचा विकास झाला असणार, रस्ते चकाचक झाले असणार, पोस्टर होर्डिंग्ज मोठेमोठे लागले आहेत. केवढा पैसा खाल्लाय तो बघा. जाहिराती तुंबळ. मलई खाऊन इथून निवडून यायचे आणि कोकण ओरबाडायचे असे इथल्या आमदाराचा उद्योग आहे. जनता विश्वासाने त्यांना मतं देत आहे, तरीही सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज नाही. गेली पाच वर्षे सोडली तरी त्याआधी आम्ही त्यांच्यासोबत होतो. हिंदुत्वासाठी आम्ही त्यांना साथ दिली. तरीही अजून इथे प्रथामिक सुविधा का नाही, याचे उत्तरं कोण देणार, असा सवालही त्यांनी केला.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन यांच्याशी आमचे चांगले संबंध होते. त्याकाळी सुसंस्कृत, नीतीमत्ता पाळणारा भाजप होता, आताच भाजप संकरीत आहे. त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भष्टाचाऱ्यांची बीजे असलेल्या व्यक्ती घेतल्या आहेत. त्यामुळे भाजप संकरीत झाला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेतील प्रमुख मुद्दे

ठाण्याची मिसळ प्रसिद्ध असून ते गुजरातेत ढोकळा खायला गेले
राज्याच्या हक्काचे गुजरातला नेणाऱ्याला आपण दया, माया, क्षणा दाखवू शकत नाही
आपली मतं फोडायला इतर पक्ष उभे राहिलेत, गेल्यावेळी बिनशर्त पाठिंबा दिला होता, यावेळी इनशर्ट पाठिंबा दिला आहे
एकही मत आपण महाराष्ट्रद्रोह्यांना जाऊ देणार नाही
महाराष्ट्र लुटणाऱ्यांना ओरबाडणाऱ्यांना जनता आता मतं देणार नाही
इथले उद्योग गुजरातमध्ये नेत आहेत.
आपल्या निष्ठा महाराष्ट्राच्या मातीशी आहेत
मी लढतोय आणि लढणार, महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांचा मुकाबला करणारच, हा निर्धार करत मैदानात उतरलोय
निष्ठा म्हणजे काय ते माहित नसलेले आम्हांला हिंदुत्व शिकवत आहेत
उद्धव ठाकरे यांनी निष्ठा आणि कोन्होजी जेधे यांच्या निष्ठेचा दाखला दिला.
गद्दारी फक्त शिवसेनेशी झाली नाही, महाराष्ट्राशी आणि भगव्याशी गद्दारी झाली आहे
एक हे तो सेफ है हा नारा भाजपासाठी आहे, त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाले की मोदी अनसेफ होतात
जे. पी. नड्डा म्हणाले फक्त भाजप राहील, इतर पक्ष संपतील, असेल हिंमत तर संपवून दाखवाच
त्यांनी पक्ष फोडला, संभ्रम निर्माण केला, तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकलेले नाही.
गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात आम्हांला वाद करायचा नाही, कधीही केलेला नाही
गुजरात आणि इतर राज्ये असा संघर्ष उभा करत ते भिंत उभी करत आहेत
कंत्राटदारांचा विकास हाच यांचा विकास आहे
महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या आड आपण आलो आणि येणारच
ही लूट आपण थांबवली तरी आपण दिलेली वचनं आपण पूर्ण करणारच