अबू आझमींना कायमचं निलंबित करा, पुन्हा असं बोलण्याची हिंमत होता कामा नये; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनमध्ये माध्यमांशी संवाद साधला. महायुतीकडून आमदारासांठी छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला. गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टोला लगावला.

निलंबन किती मिनिटांसाठी, तासांसाठी, दिवसांसाठी केलंय हे माहिती नाही. पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये. आणि सरकारची जबाबदारी आहे, कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे. निलंबन कायमचं केलं पाहिजे, असे अबू आझमींच्या निलंबनावर उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra Budget Session 2025 – मंत्र्यांना खातं कळलं की नाही? आदित्य ठाकरे यांनी मिंधेंच्या मंत्र्याचा घेतला समाचार

महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज दाखवताहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचाही चित्रपट दाखवला पाहिजे. जे खास करून सुरतेला पळून गेले त्यांना स्वराज्यसाठी सुरत लुटणारा राजा कसा होता? त्यांचं शौर्यही समजलं पाहिजे. ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांना ते भोगावं लागलं त्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट या गद्दारांना दाखवलाच पाहिजे. जे काही ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआयच्या भीतीने पळून गेले त्यांनी छत्रपती संभाजी महाराज ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दाणपट्टा फिरवला.

नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवा; विरोधकांची विधान परिषदेत अविश्वास प्रस्तावाची सूचना

‘अविश्वास प्रस्ताव आणायला उशीर’

नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीर झाला. आतापर्यंत त्या निलंबित व्हायला पाहिजे होत्या. कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनात चर्चा आम्हाला अपेक्षित आहे. कोणीही असलं तरी त्यानी जर का एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास प्रस्ताव ज्या कारणासाठी आणला आहे ती कारणं समोर येतील. पण पक्षांतर हाही एक विषय आहे. मला असं वाटतं यापूर्वीच हा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.