कॅम्लिनचे सुभाष दांडेकर यांच्या स्मृतींना उजाळा, मान्यवरांनी वाहिली आदरांजली

कॅम्लिनचे सर्वेसर्वा, मराठी उद्योजक दिवंगत सुभाष दांडेकर यांना आज वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये आयोजित शोकसभेत मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शोकसभेला उद्योग, राजकीय, सामाजिक, फॅशनसह सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शोकसभेला उद्योजक सुरेश कोटक, राम गांधी, अनंत सिंघानिया, विठ्ठल कामत, उद्योजिका मीनल मोहाडीकर, किरण शांताराम, छाया मोमया, विजय कलांत्री, नंदकिशोर कागलीवार, शुश्रूषा रुग्णालयाचे डीन डॉ. मंडलिक, जे. जे. स्पूल ऑफ आर्टचे डीन डॉ. साबळे आदी मान्यवर उपस्थित हेते. यावेळी सुभाष दांडेकर यांचे लहान भाऊ दिलीप दांडेकर, मुले आशीष आणि मुलगी अनघा दांडेकर, त्यांची सून आणि नातवंडे, पुतणे श्रीराम दांडेकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. सुभाष दांडेकर विश्वस्त असलेल्या ब्राह्मण सभा गिरगाव, फडके गणेश मंदिर-गिरगाव आणि महालक्ष्मी मंदिराचे मान्यवरही उपस्थित होते.

उद्योग विश्वातील एका मराठमोळय़ा यात्रेची समाप्ती झाली, उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

सुभाष दांडेकर यांच्या निधनामुळे उद्योग विश्वातील एका मराठमोळय़ा यात्रेची समाप्ती झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष दांडेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

सुभाष दांडेकर यांनी उद्योगासाठी जे क्षेत्र निवडले ते रंगतदार होते. रंग, रेषा, भाषा, संस्पृती, पुंचला, लेखनाशी संबंधित सर्व काही अशा क्षेत्रात त्यांनी आपल्या ‘कॅम्लिन’ची सुरुवात केली. आता ती कोपुयो कॅम्लिन झाली. शालेय जीवनापासून सगळय़ांचाच कॅम्लिन उत्पादनाशी संबंध आला. पंपासपेटय़ा, रंगपेटय़ा, रंग खडू, पेन्सिली, शाई, पुंचले असे बरेच साहित्य त्यांच्या उद्योगाशी संबंधित होते, पण अनेक कलावंत चित्रकारांचे आवडीचे रंग व पुंचले हे दांडेकरांच्या कॅम्लिनचेच असतात. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या फटकाऱयात कॅम्लिनच्या शाईचे योगदान राहिले आहे. दांडेकर पुटुंबाशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळय़ाचे नाते होते. दांडेकरांची उद्योग क्षेत्रातील भरारी शिवसेनाप्रमुखांच्या आदराचा विषय राहिली. सुभाष दांडेकर हे उद्योजक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. कॅम्लिनने जागतिक सीमा ओलांडल्या, पण सुभाष दांडेकर यांनी आपले मराठीपण शेवटपर्यंत टिकवले. मराठी भाषा, संस्पृती अशा अनेक उपक्रमांत त्यांचे योगदान मोठे होते. सुभाष दांडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने उद्योग जगतातील आपला कर्तबगार सुपुत्र गमावला. शिवसेना व ठाकरे परिवार सुभाष दांडेकर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहेत, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

उद्धव ठाकरे यांच्या शोकसंदेशाचे वाचन शोकसभेत शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी केले व श्रद्धांजली वाहिली.