
गुजरातमधील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱयांना गुजरात राज्यात बुथ लेवलपासून संघटन मजबूत करण्यावर भर देऊन पक्षबांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, हिंद केसरी श्रमिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते दीपक राऊत, गुजरात माजी राज्यप्रमुख दीपक खर्शिकर, बिमल भट, अरुण कलाल, दिलीप अहिर, मंजुषा गायकवाड आणि रश्मी साळगावकर यांच्यासह 70 हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपण कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत खंबीरपणे उभे आहोत, अशी शाश्वती पदाधिकाऱयांनी दिली.