पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

आताचा अर्थसंकल्प हा हताश आणि निरर्थक होता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प होता. हताश आणि निरर्थक असा हा अर्थसंकल्प होता. ज्या ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी थापारुपाने मारल्या होत्या, त्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. ही अस्वस्थता लपवणारं, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. या अधिवेशनात ज्या गोष्टी यांनी सांगितल्या होत्या. हे सरकार जेव्हा स्थापन झालं, तेव्हा 100 दिवसांत आम्ही काय करणार हा एक संकल्प त्यांनी केला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत. हमीभावापेक्षा कमी भाव शेतमालाला मिळतोय. 100 दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या काय योजना आहेत किंवा बोलण्यात आल्या आहेत किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याच्या पलीकडे त्यांच्या जो संकल्प जो होता करणार तो तर कुठे दिसलेला नाहिये. पण महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांत एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली. सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली, स्वारगेटमध्ये बलात्कार झाला, रोज भ्रष्टाचाराचे प्रकरणं बाहेर येत आहेत. मुंबईचा रस्ता घोटाळा. आपल्या माध्यमातून जनतेसमोर आलेला आहे. संपूर्ण मुंबईत खोदकाम केलेले आहे. अॅडवान्स दिलेला आहे, कुणाला दिला आहे. याबाबत अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली होती. पण त्याचे पुढे काय झालं. त्यावर गुन्हे शाखा चौकशी करणार आहे का? हा भ्रष्टाचाराचा पैसै कुठे गेला, कुणाच्या खिशात गेला, कोणत्या कंत्राटदाराला हे कंत्राट मिळालं. याबाबत समाधानकारक उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेली नाहीत. कर्जमाफी करणार होते, त्याबाबत कुठेही वाच्यता नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते, त्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. उलट लाडक्या बहिणींमध्ये वर्गवारी केली जाते, त्यांची कागदपत्र तपासली जाणार. म्हणजे तुम्ही मतं घेताना जे करायचं होतं ते केलं. आता माझ्या बहिणींची कागदपत्र तपासणार, आता नको ती योजना असं म्हणायची वेळ या बहिणींवर येतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरटकर सापडला, किती शिक्षा मिळणार हे माहित नाही, सोलापूरकर मस्तीमध्ये फिरतोय त्याबद्दल वाच्यता नाहिये.

तसेच नागपूरमध्ये दंगल झाली, बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपुरात जातीय दंगल झाली. आम्हाल असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. पण ज्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोंब फुटलेले आहेत, ते कोंब अजून काही जात नाहियेत. मुख्यमंत्र्यांनाही तो प्रश्न पडला असेल की सगळंकाही देऊन सुद्धा हे असे का वागत आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की या अधिवेशनाचे फलित काय? अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने एक उत्तम गाणं दिलं, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. हे गाणं संपूर्ण देशात प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जातंय. हे चांगलं गाणं अधिवेशन काळात देशाला मिळालं असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं पण या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय झाला नाही. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, यालाच सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला. की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझं सरकार हा एक उल्लेख असतो. आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आलेत. आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेतात कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली. राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता. आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडे व्यक्त करायच्या. पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनीसुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला. राज्यपाल महोदयांनी यांच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते. तसेच विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामे ठेवू शकता हा एक विषय आहे. कालच संविधानावर चर्चा झाली. विरोधी पक्ष नेता हे संविधानात्मक पद आहे. त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्यात काय अटीतटी शर्थी किंवा कायदा नियम असं काही नाहीये. विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि यापूर्वीचे दाखले सुद्धा आहेत. लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा नाही. काही असेल त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी लिहून द्यावं असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतय. गेल्या वेळेला या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तस सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही.

शिवसेना एकच आहे दुसरी ती गद्दार सेना आहे. मी उघड उघड म्हणतोय की गद्दारांची सेना आहे. तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काहीचाही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्यांचं नाव नाही घेतलं त्याचं. पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये. पण एसनशी बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसनशी गद्दार आहे. सत्य सत्य हे सत्यच असतं. इतके वर्ष अख्खी गावागावात 50 खोके एकदम ओके हे गावकरी त्यांच्या बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रशांत कोरटकरकडून एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो. असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा, कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला? तुम्ही पण गोंधळात पडला ना? आता तुम्ही काय म्हणालात आपटेची शाळा. आपटे कुठे आहेत आपटे कुठे आहेत? तेव्हा जे काय काहूर उठलं होतं अक्षय शिंदेच्या एनकाउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का? तर आज ते संचालक कुठे आहेत त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. तसंच कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार? दोन दिवस सोडा अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात काय करणार त्याला किती दिवस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थातूर मातूर सुरू आहे. सोलापूरकर कुठे? सोलापूरकर जो महाराजांची उघड एवढी बदनामी करतोय. गद्दाराचा अपमान तुम्हाला सहन होत नाही, त्याचा स्टुडिओ तुम्ही तोडताय, त्याला दोन दोन समन्स पाठवताय. सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. त्या कामरावर कारवाई करण्याचा काही अधिकार आहे का? तुम्ही कोणाचा आदर्श घेऊन चाललात छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? खंडोजी खोपडेचा कुणी अपमान केला तर तुम्ही त्याला ताबडतोब शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा अपमान केला तर तुम्ही चोर पोलीस खेळणार? का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.