
फ्रान्सच्या इकोल सुपरिअर रोबर्ट डी सोर्बन संस्थेमार्फत डॉक्टरेट मिळालेल्या शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विशेष कौतुक केले.
शिवसेना भवन येथे दर आठवडय़ाला सुरू असलेल्या जनता दरबारमुळे जनतेचे प्रश्न आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाने सोडवल्यामुळेच आपल्याला ही पीएचडी मिळाली, अशा भावना नितीन नांदगावकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यावर असेच चांगले काम करत राहा, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिल्या.