महाराष्ट्र आपला स्वाभिमानी बाणा कायम राखणार, उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेल्या बिटकॉईनवरील आरोपांवर शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाच्या थापांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करतानाच, भाजपने कितीही थापा मारल्या तरी महाराष्ट्र महाराष्ट्राचा बाणा कायम राखल्याशिकाय राहणार नाही, असे उद्धक ठाकरे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी कांद्रे पूर्व येथे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी निवडणुकीत बिटकॉईन या परकीय चलनाचा कापर केला असा आरोप भाजपचे सुधांशू त्रिकेदी आणि पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केला आहे. त्यासंदर्भात माध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला होता.

शिवसेना शाखांना दिल्या भेटी

मुंबई-महाराष्ट्रातील मतदारांनी सहकुटुंब सहपरिवार मतदान वरून महाराष्ट्राचा स्वाभिमान जपाौ, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले. मतदान केल्यानंतर मुंबईतील शिवसेना शाखांनाही भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. याकेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई हेसुध्दा होते. गिरगावमधील शाखेला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर भायखळा, चिंचपोकळी, शिवडी आणि लालबाग येथील शिवसेना शाखांनाही त्यांनी भेटी दिल्या. मतदान सुरळीत सुरू आहे ना, बारीक लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिल्या.