पुन्हा बॅगेची तपासणी, उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले…

औसा येथे उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्या बॅगा तपासण्यासाठी आले. त्या वेळी उद्धव ठाकरे आणि अधिकाऱयांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडियो उद्धव ठाकरे यांनी काढला.

उद्धव ठाकरे – दादा एक मिनिट. पहिले आयकार्ड दाखवा. काय नाव (तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱयाला सांगत)

अधिकारी – महेश शानिमे

उद्धव ठाकरे  – महेश… शहाणपण… काय

अधिकारी – शानिमे

उद्धव ठाकरे – कुठले?

अधिकारी – जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, औसा

उद्धव ठाकरे – अपॉइंटमेंट लेटर कुठे आहे तुमचे. दाखवा (अधिकारी मोबाईल पह्नमध्ये शोधू लागतात). सगळ्यांची पाकिटे दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत. सगळ्यांचे पैसे तपासा.

उद्धव ठाकरे – तुमचे नाव काय (दुसऱया अधिकाऱयाला विचारत)

अधिकारी – हनुमंत भानके, कृषी विभाग

उद्धव ठाकरे – तुमचे नाव काय (तिसऱया अधिकाऱयाला विचारत)

 अधिकारी – बालाजी देवराळे, कृषी विभाग

 उद्धव ठाकरे – फोटो… दादा या, तुमचे नाव काय (पॅमेरामनला बोलवत)

पॅमेरामन – प्रदीप हुंजे

उद्धव ठाकरे – महाराष्ट्रातले सर्व जण आहात. तुमचे अपॉइंटमेंट लेटर दाखवा. कधीपासून नोकरीत आहात. किती जणांना आज तपासलेय. नावे सांगा. लवकर सांगा, पटपट पटपट…

बालाजी देवराळे – सर आपली पहिलीच सभा आहे.

उद्धव ठाकरे – माझी पहिलीच. दरवेळेला मीच पहिला गिऱहाईक. आज आता मोदी येताहेत. मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे.

बालाजी देवराळे – अडचण नाही सर.

उद्धव ठाकरे – नाही अडचण नाही. मोदींना तपासणाऱयांना ओडिशात सस्पेंड केले होते. आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे ही परत माझी जाहीर सभेत मागणी आहे. तपासा. घ्या… या. पोलीसदादा या… या… तुमचापण पह्टो काढतो या (पोलिसाला बोलवत), तपासा… काय तपासायचेय… लवकर या.

(सर्व अधिकारी बॅगा तपासायला सुरुवात करतात)

उद्धव ठाकरे – एक काम करता का. बॅग ठेवता तुमच्याकडे. मी आल्यावरती… नाहीतर तुम्ही पुढच्या मुक्कामावरती घेऊन जा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. या तपासा… या… असे बघा ना… लाजू नका!

(अधिकारी बॅग उघडून तपासणी करतात)

उद्धव ठाकरे  – सगळ्यांची नावे आली आहेत, ती जाणार आहेत टीव्हीवर. तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काही काळजी करण्याचे कारण नाही.

(अधिकारी बॅगा तपासून झाल्याचे सांगतात)

 उद्धव ठाकरे – माझा काही तुमच्यावरती राग नाही. मला जो यांचा एकतर्फी कारभार चाललाय… मला जो न्याय तोच मोदींना लागला पाहिजे… कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. ठीक आहे. तुमच्यावरती माझा काही राग नाही, तुम्ही काही काळजी करू नका.

सर्व अधिकारी – हो साहेब…

उद्धव ठाकरे – धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात रहा. महाराष्ट्रातलेच आहात ना सगळे.

सर्व अधिकारी – हो हो (नमस्कार करत).

उद्धव ठाकरे  –  मग महाराष्ट्रासाठीच जगायचे आणि महाराष्ट्रासाठीच मरायचे. बाकीच्यांच्या, इतर राज्यातल्यांच्या नोकऱया चाकऱया करायच्या नाहीत. चला. धन्यवाद!

उद्धव ठाकरे – तुमच्या कलेक्टरसाहेबांचे नाव काय?

अधिकारी ठाकूर… वर्षा ठाकूर…

 उद्धव ठाकरे ः वर्षा ठाकूरताई. बरं ठीक आहे. जय महाराष्ट्र!

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)