मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत 6 जागांवर मतदान सुरू आहे. यासाठी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, सौ रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

सर्व मतदार जुलाबाजीला त्रासलेले आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असून आपल्या मतदानाचा हक्क अबाधित रहावा यासाठी मतदान करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पराभवाच्या भीतीने शिवसैनिकांना अटक; पोलीस, निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव, संजय राऊत यांचा संताप

यंदाच्या निवडणुकीमध्ये पैशांचा प्रचंड वापर होत आहे? या प्रश्नालाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. जुमलेबाजांच्या बाजुने हाच मोठा निगेटीव्ह विषय आहे. पण पैशास पाऊस लोकं स्वीकारणार नाहीत. पैसा घेऊन कोणी आपले आयुष्य विकायला तयार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)