उद्धव ठाकरे-राज ठाकरे विवाह सोहळ्यात एकत्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत कुटुंबातील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मनसोक्त गप्पाही रंगल्या.

राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती ठाकरे-देशपांडे यांचा चिरंजीव यश याचा विवाह सोहळा दादर येथील राजा शिवाजी विद्यालय येथे पार पडला. या सोहळय़ाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आलं. या सोहळय़ात उद्धव आणि राज ठाकरे यांची भेट झाली. दोन्ही बंधू शेजारी-शेजारी उभे होते. दोघांमध्ये गप्पा रंगल्या आणि हास्यविनोदही झाले. उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यही या सोहळय़ाला उपस्थित होते.

रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा चिरंजीव शौनक याचा विवाह सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळय़ाला राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यांचे रश्मी ठाकरे यांनी स्वागत केले होते.