महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा! उद्धव ठाकरे यांचं आवाहन; वांद्रे येथे सहकुटुंब मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात मतदान सुरू आहे. सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब वांद्रे पूर्वमधील मतदारसंघात मतदान केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी आमदार अॅड. अनिल परबही उपस्थिती होते. येथे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले. मतदानानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन निश्चित, शरद पवार यांना विश्वास; माळेगावमध्ये केलं मतदान

भाजपने कितीही थापा मारल्या तरी महाराष्ट्र आपला बाणा कायम राखल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व मतदारांना मित्र, सहकुटुंब मतदानाला उतरण्याचे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचे आवाहनही केले.