काळ्या कामगार कायद्याला विरोध करावाच लागेल, उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

कामगारांच्या विरोधातील काळा कायदा आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही. मी मुख्यमंत्री असताना हे विधेयक आम्ही अडवले. आम्ही विधेयक अडवले म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाडले; पण कामगारांच्या विरोधातील काळ्या कायद्याला विरोध करावाच लागेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडली.

भारतीय कामगार सेनेची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवाजी मंदिरमध्ये झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शनपर भाषण झाले. या सभेला शिवसेना नेते सुभाष देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, उपाध्यक्ष विनोद घोसाळकर, आमदार सचिन अहिर, नवनियुक्त सरचिटणीस आमदार मनोज जामसुतकर, शिवसेना उपनेते संजय सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, खजिनदार मनोहर साळवी, रघुनाथ कुचिक, संदीप राऊत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लार्सन अँड टुब्रो कंपनीतील भारतीय कामगार सेनेच्या युनिटला 62 वर्षे, तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील युनिटला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय कामगार सेनेची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी शिवाजी मंदिरमध्ये झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, उपाध्यक्ष विनोद घोसाळकर, आमदार सचिन अहिर, सरचिटणीस आमदार मनोज जामसुतकर, संजय कदम, उपनेते संजय सावंत आदी उपस्थित होते.