
मध्य प्रदेशमधील मांडला जिल्ह्यात माओवादी व पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ममता उर्फ रमाबाई आणि प्रमिला उर्फ मासे मांडवी अशी त्या महिला माओवाद्यांची नावे असून या दोघींच्या डोक्यावर पोलिसांनी प्रत्येकी 14 लाखांचे बक्षिस ठेवले होते.
मध्य प्रदेश छत्तीसगढ महाराष्ट्रा सीमेवर अॅक्टिव्ह असलेल्या भोरोमदेव एरिया कमिटीच्या या दोघीही सदस्या होत्या. मांडला जिल्ह्यातीस कान्हा नॅशनल पार्कमधील मुंडिदादर-घनेरदादर- परसटोला जंगलात काही माओवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानंतर या जंगलात पोलिसांनी शोध कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्या.