बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला दलालांना अटक करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. हसीना खान आणि सालिया खान अशी अटक केलेल्या महिला दलालांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या ताब्यातून एका बांगलादेशी पीडितेची सुटका केली आहे.
तळोजा फेस दोनमधील साई आनंद बिल्डिंगमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी केली असता दोन महिला दलाल वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या दोन्ही दलालांना ताब्यात घेऊन तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर पीडित बांगलादेशी महिलेला चेंबूर येथील नवजीवन सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी फिल्मीस्टाईलने सापळा रचून घटनेचा पर्दाफाश केला.