जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत बुधवारी जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. उधमपूरच्या बसंतगढ भागात ही चकमक सुरू आहे.
बसंतगढ परिसरात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाकडून गोळीबार करण्यात आला. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दहशतवादी होते. मिळालेल्या माहितीनुसार बसंतगढ परिसरात तीन ते चार दहशतवादी लपले होते.