इस्लामचा अपमान करणारे दोन विद्यार्थी निलंबित

बांगलादेशमधील ढाका येथील पबना विज्ञान आणि टेक्नोलॉजी विद्यापीठाने इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दोन विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित केले. बिकर्ण दास दिव्या आणि प्रणय कुंडू अशी दोन विद्यार्थ्यांची नावे असून ते हिंदू आहेत.

या दोन विद्यार्थ्यांशिवाय आणखी पाच विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठातील डॉ. कमरउज्जमान खान यांनी सांगितली. इस्लामचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.