साईभक्ताकडून 11 किलो चांदीचे दोन दंड अर्पण

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. एका साईभक्ताने साईचरणी अंदाजे 9 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 11 किलो चांदीचे 2 दंड अर्पण केले आहेत. या दंडांचा श्रींचे आरतीवेळी ललकारीसाठी वापर करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. हे दंड अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्‍ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. 11 किलो चांदीचे 2 दंड श्री साईबाबा संस्‍थानला देणगीस्‍वरुपात दिल्‍यानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.