नौदलातील दोन धाडसी महिला ‘आयएनएसव्ही तारिणी’वर स्वार होऊन सागरी सफरीवर निघालेल्या आहेत. लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए. अशी दोघींची नावे आहेत. तारिणी नौकेत स्वार होऊन त्या जग फिरणार आहेत. त्यांची मोहीम सोपी नाही. चार महासागरांतून त्या प्रवास करत आहेत. नुकतेच त्यांनी जमिनीपासून सर्वात दूर असलेले ‘पॉईंट निमो’ गाठले. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नौदलाने आज पोस्ट लिहून लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि रुपा ए. यांच्या धडाकेबाज कामगिरीची माहिती दिली.
काय आहे निमो पॉईंट
– निमो पॉईंट म्हणजे दक्षिण पॅसिफिक महासागरात आत खोलवर असलेली जागा, जी जमिनीपासून सर्वात दूर आहे. ही जागा अंटार्टिका पासून 1674 मैल दूर आहे. डुसी आर्यर्लंडपासून 1666 मैल, इस्टर आर्यर्लंडपासून 1666 मैल आणि चिलीपासून 2624 मैल दूर आहे. सागरी प्रवासातील हा अत्यंत दुर्गम बिंदू आहे.
– ऑक्टोबर 2024 मध्ये माजी नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी ‘आयएनएसव्ही तारिणी’ला हिरवा झेंडा दाखवला. या मोहिमेंतर्गत लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए. या दोघी
240 दिवसांत 23400 मैल समुद्री यात्रा करणार आहेत. चार महाद्वीप, चार महासागरांतून त्यांची सफर सुरू राहील.