‘पाक’चा नापाक डाव उधळला; घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचा एक अधिकारी शहीद

जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा नापाक डाव हिंदुस्थानी लष्कराने उधळून लावला आहे. लष्कराच्या जवानांनी सापळा रचून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुंदरबनीच्या केरी-बट्टल भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावताना जनरल ऑफिसर कमांडिंग सब कुलदीप चंद हे शहीद झाले आहेत. ‘एएनआय’ने ट्विट करत ही माहिती दिली.

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ‘ऑपरेशन छत्रू’ सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली. लष्कराच्या जवानांनी सुरुवातीला एका दहशतवाद्याला टिपले होते. त्यानंतर खराब हवामानाची तमा न बाळगता कारवाई सुरू ठेवली आणि आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांकडून एके आणि वन एम 4 रायफसलह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.