चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना जमावाने विवस्त्र करून मारहाण केली आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
17 आणि 14 वर्षाचे भाऊ आपल्या आजोबांसोबत राहत होते. त्यांच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पहाटे तीन वाजता दोघे भाऊ मेडिकलमध्ये औषध आणायला गेले होते. तेव्हा तिथल्या जमावाने त्यांना हटकलं. आणि चोर समजून त्यांना मारहाण केली. त्यांचे कपडेही काढले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास पुन्हा मारण्याची धमकी दिली. दोन्ही मुलं आपल्या आजोबांकडे रडत रडत गेले आणि झाली हकिगत सांगितली. या मारहाणीचे व्हिडीओ आरोपींनी रेकॉर्ड केले होते. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी दखल घेतली आहे. तसेच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.