एमएचबी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी 20 हजार घेताना ट्रॅप, ऍण्टी करप्शन ब्युरोची कारवाई

एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुह्यात मदत करण्याबरोबर चारचाकी गाडी सोडून देण्यासाठी गुह्यातील आरोपीकडे 35 हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी 20 हजार रुपये घेताना सहाय्यक फौजदार व एका पोलीस शिपायाला रंगेहाथ पकडण्यात आले. अॅण्टी करप्शन ब्युरोने लावलेल्या सापळय़ात  हे दोघे अडकले.

करण (नाव बदललेले) यांच्या विरोधात एमएचबी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. त्या गुह्यात मदत करण्यासाठी तसेच अपघातातील चारचाकी गाडी सोडून देण्याकरिता सहाय्यक फौजदार सुनील देसाई (51) यांनी 35 हजार रुपयांची मागणी केली होती, परंतु लाच द्यायची नसल्याने करण यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने सापळा लावला.