ईस्टर्न फ्रीवेवर कार अपघातात दोघांचा मृत्यू

ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ सोमवारी कार अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. रामजी जयस्वार (60) आणि विनोद वैद्य (52) अशी मृतांची नावे आहेत. सहा जणांना घेऊन इको कार ठाण्याहून मुंबईच्या दिशेने मासे खरेदीसाठी जात होती. ईस्टर्न फ्रीवेवर चालकाने कारचा वेग वाढवला. वेगात असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळून पलटी झाली. यात दोघांचा मृत्यू झाला.