नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या 20 लाख रुपयांची रोकड बाळगल्याप्रकरणी दोन हिंदुस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रहिवासी सलमान कुरैशिया आणि उमेश खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नेपाळ-हिंदुस्थान सीमेवर नियमित तपासणी करत असताना या दोघांकडे ही रोकड सापडली आहे.