अमेरिकेत हिंदुस्थानी बाप-लेकीची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतरही हिंदुस्थानींवरील हल्ले कायम आहेत. हिंदुस्थानी वंशाचे प्रदीपकुमार पटेल (56) आणि त्यांची मुलगी उर्वी पटेल (24) यांची व्हर्जिनिया येथील स्टोअरमध्ये गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. ते मूळचे गुजरातमधील होते. 20 मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी जॉर्ज फ्राझहर (44) या संशयिताला अटक करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी पहाटे 5.30 वाजता गोळीबाराची घटना घडली.