
दुचाकीवर चालकासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागते. मुंबईसारख्या शहरात सहप्रवाशाकरिताही हेल्मेट वापराची सक्ती अधूनमधून होत असते, मात्र चालकांच्या विरोधामुळे ती सक्ती काही दिवसच टिकते. आता नियमाला अनुसरून दुचाकी विकतानाच दोन हेल्मेट देणे बंधनकारक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नवी दिल्लीत झालेल्या ऑटो समिटमध्ये याची घोषणा केली. ‘टू व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’नेही या नियमाचे स्वागत केले आहे.