बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी पुकारलेला दोन दिवसांचा संप स्थगित केला आहे. सार्वजनिक, खासगी, सहकारी, विदेशी तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांचे आठ लाखांहून अधिक कर्मचारी 24 व 25 मार्चला संपावर जाणार होते. तथापि, पेंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा सुरु केली. त्या पार्श्वभूमीवर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी पेंद्रीय कामगार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.