सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयक्त विद्यमाने ‘साहित्य- कला संवाद 2025’ चे आयोजन केले आहे. ‘विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार’ या विषयाभोवती यंदा साहित्य कला संवाद गुंफला आहे. 4 व 5 जानेवारी रोजी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम होईल.
4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नागराज मंजुळे, नितीन वैद्य, प्रमोद निगुडकर, हेमंत टकले, नीरजा, युवराज मोहिते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल, तर 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. यादरम्यान चर्चा, सादरीकरण व मुलाखतींची रेलचेल असेल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
4 जानेवारी – सकाळी 11.30 वाजता, विद्वेष नाकारणारे आवाज, सहभाग- सबा नक्वी, संग्राम गायकवाड, मनीषा कोरडे संवादक गणेश विसपुते. दु. 2.30 वाजता, ढाई आखर प्रेम के, सहभाग- मुक्ता दाभोलकर, शंकर कणसे, आरती व गणेश रोकडे, काव्य व केतन राऊत, संवादक प्रदीप आवटे. सायं. 4 वाजता- पर्यायी माध्यमातले शिलेदार, सहभाग- प्रशांत कदम, राजू परुळेकर, वरुण सुखराज, संवादक आलोक देशपांडे. सायं. 6.30 वाजता रंगचित्र यात्रेतला अमोल ऐवज अमोल पालेकर, संवादक किशोर कदम, युवराज मोहिते सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ. 5 जानेवारी- सकाळी 11 वाजता, ईदगाह- कथा मुंशी प्रेमचंद, सादरकर्ते – अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, दु. 2 वाजता, बाऊलगान, सादरकर्त्या उत्तरा चौसाळकर, संवादक मुकुंद कुळे, दु. 3.30 वाजता आजचा काळ व कलेचं जतन सहभाग- प्रभाकर कांबळे, राजू सुतार, राजेश कुलकर्णी, संवादक – अभिजीत कुलकर्णी.