मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा–वांद्रे – सीप्झ मेट्रो 3’ मार्गिकेवरील काही स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत एमएमआरसीने संबंधित कंत्राटदाराला हलगर्जीपणाबद्दल दोन कोटींचा दंड ठोठावला आहे. एमएमआरसीने 33.5 किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो 3’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील आरे-बीकेसी टप्पा शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. त्यानुसार सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. असे असताना आता सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘मेट्रो 3’च्या पहिल्या टप्प्यातील काही मेट्रो स्थानकांत पावसाचे पाणी शिरल्याने आता सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हलगर्जीपणाबद्दल जे. कुमार आणि सीआरटीजी (संयुक्त) या कंत्राटदार कंपन्यांना दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.