![accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/shahapur-st-bus-accident-news-696x447.jpg)
रायगडावरून दुचाकी ने परतणाऱ्या दोन शिवभक्तांवर गुरुवारी रात्री काळाने झडप घातली. खोपोली-पाली रस्त्यावर दुरशेत गावाच्या हद्दीत मोटारसायकल अपघात झाला असून यात दोन तरुण जागीच ठार झाले. मृत तरुण बोरिवली येथील रहिवासी होते.
बोरिवली येथील आठ युवक चार मोटारसायकलवरून रायगड किल्ल्यावर गेले होते. रात्री सुधागड-पाली-खोपोली मार्गे मुंबईकडे परतत असताना एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर पाठीमागे असलेल्या तरुणाला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील अमडस्कर (29) व हृतिक महाडिक अशी मृतांची नावे आहेत.