कोस्टल रोडवरील बोगद्यात आज सकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात काही वाईट घडले नाही, पण दोन्ही गाडय़ांचे नुकसान झाले. मरीन ड्राईव्ह येथील कोस्टल रोडच्या बोगद्यात आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास दोन कार समोरासमोर एकमेकांना धडकल्या. ही धडक भीषण नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात गाडीमधील काहींना किरकोळ दुखापती झाली. याप्रकरणी कोणीही पोलिसांत तक्रारदेखील केली नसून त्यांनी परस्पर सामंजस्याने हे प्रकरण हाताळल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले, मात्र या घटनेनंतर काही काळ वाहतककोंडी झाली होती.