संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केल्याचे समजते. सुदर्शन घुले व सुधीर सांगळे अशी त्या आरोपींची नावे असून सुदर्शन या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सीआयडीच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.

आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवार 4 जानेवारी रोजी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.