हिना खानला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर, सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. हिना खान हिला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. खुद्द हिनानेच याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हिनाला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.

अनेक दिवसांपासून हिनाला कॅन्सर झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता हिनाने स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याला चर्चेवर शिक्कामोर्तब केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@realhinakhan)

“जे माझ्यावर प्रेम करतात, माझी काळजी करतात त्यांच्यासोबत मला एक महत्वाची बातमी शेअर करायची आहे. मला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला असून, यावर उपचार सुरू आहेत. भयंकर त्रास होत असला तरी मी खात्री देते की मी ठीक आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी मी तयार आहे. मला खंबीर बनवणारी प्रत्येक गोष्ट करायला मी तयार आहे.” असे हिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पुढे हिनाने आपल्या प्रायव्हसीबाबतही लिहिले आहे. मी आपल्या प्रेमाचा आदर करते. मात्र सध्या आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना विश्वास आहे की मी लवकरच कॅन्सरवर यशस्वी मात करेन. सध्या तुमच्या प्रेम आणि आशिर्वादाची मला गरज आहे.