
हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात या वर्षीच्या अखेरपर्यंत दोन शक्तिशाली युद्धनौका येणार आहेत. या युद्धानौकांची उभारणी रशियामध्ये होतेय. शत्रूला धडकी भरवणाऱया या दोन्ही युद्धनौका तलवार क्लासच्या स्टेल्थ फ्रिगेटच्या आहेत. एकीचे नाव आयएनएस ‘तुशील’ असून ती या वर्षीच्या अखेरपर्यंत नौदलला मिळेल. दुसऱया युद्धनौकेचे नाव आयएनएस ‘तमाला’ असून ती पुढील वर्षापर्यंत मिळेल.
आतापर्यंत तलवार क्लासच्या सात युद्धनौका बनवण्यात आल्या असून त्यातील सहा कार्यान्वित आहेत. आणखी चार युद्धनौका बनवण्यात येत असून दोन रशियात, तर दोन हिंदुस्थानात तयार होतील. युद्धनौकांच्या माध्यमातून समुद्री चाचे तसेच पाकिस्तान, चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच आवश्यकता वाटल्यास कठोर कारवाई केली जाईल.
n दोन्ही युद्धनौकांची समुद्रातील डिसप्लेसमेंट 3850 टन आहे. त्याची लांबी 409.5 फूट, बीम 49.10 फूट, युद्धनौका ताशी कमाल 59 किमी वेगाने चालू शकेल. जर युद्धनौकेचा वेग ताशी 26 किमी केला तर ती 4850 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. ताशी 56 किमी वेगाने चालल्यास 2600 किलोमीटरचे अंतर पार करेल.
n युद्धनौकेवर 18 अधिकाऱयांसह 180 जवानांना 30 दिवसांपर्यंत समुद्रात तैनात करता येईल. त्यानंतर त्यामध्ये रसद आणि इंधन भरावे लागेल.
n युद्धनौका इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणेने सज्ज असतील. त्यामध्ये चार केटी – 216 डिकाॅय लाँचर्स असतील. मीडियम रेंजची मिसाईल, व्हर्टिकल लाँच अँटी शिप, लँड अटॅक ब्रह्मोस क्षेपणास्त्रs सज्ज असतील. 100 मिमीची नेवल गन आणि 76 मिमीची ओटो मेलारा नेवल गन लावलेली असेल. दोन खतरनाक बंदुकाही असतील. याशिवाय दोन 533 मिमीची टॉरपीडो टय़ूब आणि एक रॉकेट लाँचरदेखील तैनात केलेले आहे.