स्वयंपाकघर – म्हावरा ताजा…

>> तुषार प्रीती देशमुख

मांसाहार करणाऱयांना जर ताजे मासे मिळाले तर खायला का नाही आवडणार? हेच ताजे मासे आपल्यापर्यंत पोहोचवणाऱया कोळी बंधू-भगिनी यांचा खडतर, पण सदैव हसतमुखाने केलेला प्रवास.

मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाणाऱया छोटय़ा होडीपासून मोठय़ा लाकडी होडी बनवणे, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणणे यांसारखी व अनेक कामे हे कोळी बंधू-भगिनी स्वत करतात. एकदा का मासेमारीसाठी होडी समुद्रात गेली की, कधी अनेक तास, तर कधी अनेक दिवस त्यांना समुद्रात रहावे लागते. समुद्र कधी शांत असतो, तर कधी रौद्र अवतार धारण करत असतो. या सर्व नैसर्गिक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते. स्वतचा जीव धोक्यात टाकून आपल्यासाठी ताजे मासे समुद्रातून घेऊन येणे हे किती जोखमीचे काम आहे याचे गांभीर्य त्यांनाच माहिती असते.

मासेमारी करणे जितक्या मेहनतीचे काम तितकेच मासे पी करणे हेही मेहनतीचे काम आहे. मासे ताजे असतानाच ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे मासे पी करणाऱया कोळी भगिनींचे काम. त्यातल्याच चार पिढय़ांपासून व्यवसायात असलेल्या मासे पी करणाऱया कुटुंबाबद्दल.

?वसई-नायगावला राहणाऱया देमूबाई पांडुरंग सतरंगे यांनी 1965 साली मासे पी व्यवसायाला सुरुवात केली. वसई -नायगावच्या समुद्रकिनाऱयावरून लिलावात मासे विकत घेऊन डोक्यावर ती माशांनी भरलेली टोपली व दोन्ही हातांमध्ये माशांनी भरलेल्या भल्यामोठय़ा पिशव्या घेऊन रिक्षाने नायगाव स्टेशनला पोहोचायचे. मग तिथून मालवाहतूकीचा डबा पकडून दादर स्टेशनला पोहोचायचे. दादर स्टेशनला मासे पी करायला लागल्यावरही कधी अंधेरी स्टेशन, तर कधी गोरेगाव, तर कधी पनवेललाही त्या मासे पीसाठी जायच्या. असा त्यांचा मासे पीचा व्यवसाय सुरू झाला. या त्यांच्या मासे पी व्यवसायात त्यांची मुलगी रुक्मिणी लहान वयातच त्यांना मदत करू लागली. 1970 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मासे पीसाठीचे लायसन्स प्राप्त झाले, तेव्हा देमूबाई यांना दादर येथील प्लाझा सिनेमाजवळच्या मासळी मंडईमध्ये मासे पीसाठी जागा मिळाली.

तेव्हा त्या मोठय़ा प्रमाणात मासे समुद्रावरून लिलावात विकत घेत. मग त्या घाऊक किमतीत मंडईत लिलावासाठी व पीसाठी आणत. नंतर व्यवसायाची व्याप्ती वाढत गेली. काही काळानंतर प्लाझा येथील मार्केट बंद झाले. तेव्हा देमूबाईंना 1998 साली कामगार मैदान येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेले मीनाताई ठाकरे मासळी मंडईमध्ये मासे पीसाठी जागा मिळाली. देमूबाईंचा हा व्यवसाय त्यांची मुलगी रुक्मिणी जगन्नाथ सतरंगे यांनी संपूर्णपणे सांभाळला, वाढवला. बघता बघता व्यवसायाची व्याप्ती इतकी वाढली की, रुक्मिणीताई टेम्पोमधून नायगाववरून मासे पीसाठी दादरला आणू लागल्या. त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची. त्यांचे संपूर्ण कुटुंब मासे पी व्यवसायामध्ये तयार झाले.

व्यवसाय वाढल्याने रुक्मिणीताईंच्या चारही मुलींनी व्यवसायातील विभाग वाटून घेतले. मासे पी व्यवसायामध्ये अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. व्यवसाय बंद करावा लागतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्यांनी एकजूट ठेवून कधीही हार मानली नाही की माघार घेतली नाही. या मासे पी व्यवसायातूनच त्यांनी त्यांचे कुटुंब सावरले. आज त्यांच्या नातवंडांनी उच्च शिक्षण घेतले आहे. चिन्मय बँकेमध्ये कामाला आहे, तर सिद्धार्थने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे, संगीत इंजिनीअर आहे, विभा शिक्षणासोबत माशांचा लिलाव व पी करण्यात तरबेज आहे. या बहिणींपैकी मिनाक्षीताई मासे पी सांभाळते. भामिनीताई लिलावाचे काम सांभाळते. कांचनताई खेकडे/चिंबोरीचा विभाग सांभाळते, तर लिनाताई व रेश्माताई सगळ्याच विभागात एकमेकींना मदत करतात. संगीता मावशी कोळंबीचा विभाग सांभाळतात. पापलेट, सुरमई, रावस, बोंबील, घोळ, बांगडा, मुशी, कोळंबी, जवळा, चिंबोरी, मांदेली, शिवल्या असे अनेक प्रकारचे ताजे मासे त्यांच्याकडे पीसाठी असतात. त्यांच्या कुटुंबाचा मासे पीच्या व्यवसायातील एक मंत्र म्हणजे, ग्राहकांना ताजे मासेच विकायचे आणि त्यांना ताजे मासे खाण्याचा आनंद मिळवून द्यायचा.

कोळी बंधू-भगिनींची मेहनत त्यांना सदैव समृद्ध ठेवते. कष्ट करता करता प्रत्येक क्षण ते आनंदाने जगत असतात. म्हणूनच कोळीगीते ही खूप प्रसिद्ध आहेत. कोळीगीत गाता गाता त्यावर ठेका धरत ते नाचण्याचाही मनमुराद आनंद घेत असतात. आपल्यालासुद्धा या कोळीगीतांवर ठेका धरण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही.

चमचमीत कोळी पदार्थांची लज्जत काही औरच असते. मग त्यात मांसाहारी असो किंवा शाकाहारी पदार्थ. हातावर बनवलेली भाकरी ही त्यांची खासियत. समुद्रकिनारी वसलेल्या या कोळी बंधू- भगिनींच्या आहारात अनेक माशांचे विविध पदार्थ असतात. ताजे मासे खाणे जितके सोपे आहे तितकेच हे ताजे मासे मासेमारी व मासे पी करून आपल्यापर्यंत पोहोचवणे अवघड आणि जोखमीचे आहे.

पावसाळ्यात जेव्हा बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात जात नाहीत, तेव्हा काही दिवसांची त्यांना रजा असते. त्या काळातच त्या सगळ्या जणी सहकुटुंब देवदर्शनाला वा फिरायला जातात. पुन्हा आल्यावर त्या सर्वजणी ऊन असो वा पाऊस मासे पीसाठी सज्ज असतात. मासे पी करणाऱया समस्त कोळी बंधू-भगिनींच्या मेहनतीला मानाचा मुजरा.

[email protected]