समुद्र कासवांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी देवगडमध्ये पहिल्यांदाच “कासव महोत्सव”

निसर्गचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याला विशिष्ट कार्य दिलेले असते. या प्राण्यांनी आपली नैसर्गिक भूमिका योग्य प्रकारे पार पाडली तर निसर्गही त्यांना भरभरून काहीतरी परत देतो. याच अनुषंगाने, समुद्र कासवांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी देवगड तालुक्यात पहिल्यांदाच “कासव महोत्सव” आयोजित करण्यात आला.मुणगे आडवळवाडी समुद्रकिनारी वनविभाग कांदळवन कक्ष, महाराष्ट्र राज्य वनपरिक्षेत्र (मालवण) यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी आपल्या भाषणात कासव संवर्धनाच्या महत्त्वावरभर देत सांगितले की,”कासवांचे संवर्धन झाले नाही तर समुद्राची

स्वच्छता, तसेच मत्स्यप्रजननावरही परिणाम होतो. त्यामुळे या संवर्धन कार्याला अधिक चालना देणे ही काळाची गरज आहे.” या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस निरीक्षक मगदूम, सावंतवाडी वनरक्षक सुनील लाड, देवगड तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, सरपंच अंजली सावंत, वनविभागीय अधिकारी कांचन पवार,सहाय्यक वनसंरक्षक (दक्षिण कोकण) प्रियांका पाटील,उपवनरक्षक (प्रा.) एस. नवकिशोर रेड्डी, वनपरिक्षेत्रपाल मालवण समीर शिंदे, सहाय्यक उपवनरक्षक सुनील लाड,वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली राजेंद्र धुणकीकर,वनपरिक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार आणि नागेश दफ्तरदार यांचा समावेश होता.

कासव संवर्धन आणि पर्यटनाचा संगम साधण्याच्या उद्देशाने कासव महोत्सवाच्या संकल्पनेला चालना दिली. यापूर्वी वेगुर्ले आणि मालवण वायंगणी येथे अशा प्रकारचे कासव महोत्सव आयोजित करण्यात आले होते.मुणगे येथील कासवमित्र अनिल रासम यांनी 2009 पासून कासव संवर्धनाची मोहीम यशस्वीरित्या राबवली आहे. यावर्षी त्यांनी मुणगे आणि मोर्वे बीच येथील 95 कासव घरट्यांची अंडीसंरक्षित कुंपण उभारून सुरक्षित ठिकाणी हलवली.या महोत्सवात उपस्थित ग्रामस्थ आणि वन विभागाच्या वतीने 14 कासव घरट्यातील पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. उर्वरित प्रकल्पातील अंडी टप्प्याटप्प्याने उबवल्यानंतर समुद्रात सोडलीजातील. यावेळी वन विभागाच्या वतीने कासवमित्र अनिल रासम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.