महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मंदिर गाभाऱयातील तीन शिळांना तडे गेल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसेच कंत्राटदार कंपनी सवानी कन्स्ट्रक्शन्सच्या अधिकाऱयांसोबत मंदिराची पाहणी केली. या वेळी गाभाऱयातीन तीन शिळांना तडे गेल्याचे दिसले. या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट व रडारच्या सहाय्याने तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे संस्थानने सांगितले.