शारदीय नवरात्रौत्सवाच्या मंगलमय पर्वास आज घटस्थापना करुन सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देऊन, साडेतीन शक्तीपीठापैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. जुना राजवाडा परिसरातील जनतेसाठी खुले असलेल्या छत्रपतींच्या देव्हार घरातील श्रीतुळजाभवानी मंदिरात ही परंपरेनुसार घटस्थापना करून नवरात्र उत्सवात सुरुवात झाली. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत असलेल्या तीन हजारांहून अधिक मंदिरात आणि शहरातील नऊ दुर्गांच्या मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली.