
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे. या पुजाऱ्यांमधील एक पुजारी सत्ताधारी पक्षातील असल्याचे बोलले जात आहे. या पुजाऱ्यांवर मंदिरात प्रेवश करण्यावर कायमची बंदी घालणार असल्याचे समजते.
तुळजापूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून ड्रग्ज तस्करीप्रकरणात मोठ्या कारवाया होत आहेत. 15 फेब्रुवारी रोजी या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीच्या 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली.