ट्रम्प हल्ल्याच्या फोटोचा टी-शर्ट बाजारात; तीन तासांच्या आतमध्ये चिनी प्लॅटफॉर्मवर 450 रुपयांना विक्रीला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी सकाळी पेनसिल्व्हेनियामध्ये एका निवडणूक रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. या गोळीबारात त्यांच्या कानाला गोळी लागली. हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या जीवघेण्या हल्ल्यातही डोनाल्ड ट्रम्प हे हवेत मूठ आळवत लढा फाईट म्हणत होते. या घटनेला दोन तास उलटत नाहीत, तोच चिनी ई-कॉमर्स कंपनी ताओबाओवर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचे चित्र असलेले टी-शर्ट विक्रीला आले. या टी-शर्टची विक्री ऑनलाईन होत असून चीनशिवाय अमेरिकेतूनही या टी-शर्टच्या ऑर्डर्स येत आहेत. एका टी-शर्टची किंमत 450 रुपये आहे. वेगवेगळय़ा घोषणा लिहून ट्रम्प यांच्या या चित्रासह टी-शर्ट डिझाईन करत आहेत. काही टी-शर्टवर ‘शूटिंग मेकस मी स्ट्राँगर’, ‘आय विल नेव्हर स्टॉप’, तर काहींवर ‘फाईट नेव्हर सरेंडर’ असे लिहिले आहे.