यूपीएससीचे ध्येय गाठण्यासाठी तब्बल 16 सरकारी नोकरीच्या संधी नाकारल्या, तृप्ती भट यांची प्रेरणादायी कथा

Deeheues ध्येय गाठण्यासाठी अनेक जण मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांवर पाणी सोडतात. तृप्ती भट या त्यापैकीच एक. तृप्ती यांनी यूपीएससी उत्तीर्ण होण्यापूर्वी एक-दोन नव्हे, तर चक्क 16 सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. त्यांची कथा फारच प्रेरणादायी आहे.

उत्तराखंडच्या आयपीएस अधिकारी तृप्ती भट यांनी इंजिनीअरिंगची डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) मध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी इस्रोसह विविध सरकारी संस्थांकडून आलेल्या नोकरीच्या ऑफर  नाकारल्या.