त्र्यंबकेश्वर देवस्थान ‘अ’ दर्जाचे तीर्थक्षेत्र

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार आहे.