भ्रष्ट देशांच्या यादीत हिंदुस्थानचाही समावेश; मोदी सरकारच्या काळात देशात भ्रष्टाचार वाढल्याचा निष्कर्ष

जगभरात श्रीमंत देश, गरीब देश, संपन्न देश अशी यादी जाहीर होत असते. तशीच आता भ्रष्ट देशांची यादी Transparency International या संस्थेने जाहीर केली आहे. या अहवालात हिंदुस्थान 96 व्या क्रमांकावर आहे. याआधी देश 93 व्या क्रमांकावर होता. म्हणजेच देशात मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढल्याचा निष्कर्ष अहवालातून निघत आहे.

Transparency International ही संस्था दरवर्षी जगातील सर्वांधिक भ्रष्ट देशांची यादी जाहीर करते. यावर्षीची क्रमावारी नुकतीच जाहीर करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे 180 देशांची क्रमवारी जाहीर केली जाते. हिंदुस्थान या यादीत 96 क्रमांकावर आहे. आपल्या देशाला फक्त 38 गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीत हिंदुस्थान 93 व्या क्रमांकावर होता. म्हणजे देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याने 3 क्रमांकाने देशाची घसरण झाली आहे.

सर्वात कमी ज्या देशात भ्रष्टाचार होतो अशा देशांमध्ये डेन्मार्कने सलग 7 व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 90 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फिनंलँड, तिसऱ्या कम्रांकावर सिंगापूर, चौथ्या क्रमांकावर न्युझीलंड आहे. त्यानंतर लग्जमबर्ग, नॉर्वे, स्वित्झर्लंड संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे. तसेच या वर्षी सूदान हा जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश ठरला आहे. या देशाला केवळ 8 गुण मिळाले आहेत. त्याला यादीत 180 वा क्रमांक मिळाला आहे. त्यानंतर सोमालिया, व्हेनेझुएला आणि सिरिया यांचा क्रमांक आहे.