राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नंदिनी आवडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी

राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधान परिषदचे उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र जिवाजी खेबुडकर यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई सह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत ‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. महेश विश्वास आव्हाड यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकाईन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई येथे नियुक्ती.
2. वैदेही मनोज रानडे यांची सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई येथे नियुक्ती.
3. विवेक बन्सी गायकवाड यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती.
4. नंदिनी मिलिंद आवाडे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे नियुक्ती.
5. वर्षा मुकुंद लड्डा यांची MAVIM, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.
6. मंगेश हिरामण जोशी यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक पदी नियुक्ती.
7. अनिता निखिल मेश्राम यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई येथे नियुक्ती.
8. गीतांजली श्रीराम बाविस्कर यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई येथे नियुक्ती.
9. दिलीप ज्ञानदेव जगदाळे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, कल्याण येथे नियुक्ती.
10. अर्जुन किसनराव चिखले यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे नियुक्ती.

राज्यातील बदल्या पुढीलप्रमाणे

1. संजय ज्ञानदेव पवार यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती.
2. नंदू चैत्राम बेडसे यांची छत्रपती संभाजी नगरमध्ये अल्पसंख्याक विकास आयुक्त पदावर नियुक्ती.
3. सुनील बालाजीराव महिंद्राकर यांची व्यवस्थापकीय संचालक, M.S. फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथे नियुक्ती.
4. रवींद्र जिवाजी खेबुडकर यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई सह सचिव येथे नियुक्ती.
5. निलेश गोरख सागर (एससीएस पदोन्नती) अनिवार्य प्रतीक्षेवर. मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, नवी मुंबई.
6. लक्ष्मण भिका राऊत यांची बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिव येथे नियुक्ती.
7. बाबासाहेब जालिंदर बेलदार यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग येथे नियुक्ती.
8. जगदीश गोपीकिशन मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती.
9. माधवी समीर सरदेशमुख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली या पदावर नियुक्ती.
10. डॉ. ज्योत्स्ना गुरुराज पडियार यांची आयुक्त, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, मुंबई येथे नियुक्ती.
11. अण्णासाहेब दादू चव्हाण यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी या पदावर नियुक्ती.
12. गोपीचंद मुरलीधर कदम यांची व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई येथे नियुक्ती.
13. बापू गोपीनाथराव पवार यांची पाणी पुरवठा व स्वच्छता सहसचिव येथे नियुक्ती.