चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे नागरी हक्क संरक्षण, अश्वती दोरजे यांच्याकडे यांच्याकडे राज्याच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस सहआयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तसेच एस. जी. दिवाण यांना राज्याच्या ऍण्टी करप्शन ब्युरोच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्त केले आहे.